उराशिमा तारो

 

सौ विदुला बुधकर –अपराजित 

उराशिमा तारो

फार फार पूर्वी  एका खेडेगावात उराशिमा तारो नावाचा प्रेमल तरुण मुलगा रहात होता. एकदा उराशिमा समुद्राजवळून जात असता समुद्र केणार्‍याजवळ खेळत असलेल्या  काही छोट्या मुलांनी कासवाला पकडले होते. ती मुले कासवाच्या खोड्या काढीत होती. खोड्या काढताना “वा किती छान ते बघ निसटले “ असे बडबडत होती. उराशीमाला वाईट वाटले. तो मुलांना म्हणाला “ तुम्ही फार वाईट आहात त्या कासवाला कशास्थी पकडले आहे ?”

कासव हे सर्व पाहत होते. वाईट वाटल्यामुळे त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. उराशीमाणे खिशातून पैसे काढून मुलांना देऊन म्हणाला “ हे पैसे घेऊन तुम्ही कासवाला माझ्या हवाली करा” मुलांनी आनंदाने  पैसे घेऊन कासवाला उराशीमाच्या ताब्यात दिले. उराशीमाणे कासवाला धीर देत आता ती मुले तुला पकडणार नाहीत असे सांगितले. कासव आनंदाने समुद्रात तलाशी निघून गेले. दोन तीन दिवसांनी उराशिमा समुद्र मासे पकडत असता त्याला कुणाची तरी हाक ऐकू आली . “ उराशिमा उराशिमा” उराशिमा आश्चर्याने इकडे तिकडे पाहू लागला. स्वत:sहीच म्हणाला “ कोण मला हाका मारीत आहे ?”

कासव समुद्रातून बाहेर येऊन म्हणाले “ अरे मी इकडे आहे. तूच माला त्या दिवशी वाचवले ना ? मी अत्यंत ऋणी आहे . तू कधी समुद्र तळाशी असलेल्या ड्रगनच्या महालात गेला आहेस का?

“कुठला महाल? कुठे आहे?” उराशिमा म्हणाला “ तुझी तेथे येण्याची तयारी आहे का ? मी माझ्या पाठीवरून घेऊन जाईन “ कासव म्हणाला. “बस माझ्या पाठीवर “ तो उराशीमाला घेऊन समुद्रात गेला.

खोल खोल जाताना उराशीमाला लाल रंगाची किरणे दिसू लागली. थोड्याच वेळात त्याला लालसर गुलाबी रंगाची छोटी वस्तु दिसू लागली. तो आश्चर्यचकीत होऊन उद्गारला “ वा,  किती सुंदर आहे उराशिमा आणि कासव भव्य दिव्य महालाशी पोहचले. ओतोहिमे, त्या महालाचा राजा आपल्या रंगीबेरंगी माशांबरोबर त्याच्या स्वागतासाठी उभा होता.  राजा म्हणाला “ तुम्ही कासवाचे प्राण वाचवले मी तुमचा आभारी आहे. चला मी तुम्हाला आमचा महाल दाखवतो . तुम्ही नि:संकोचपणे या .” उराशिमा राजबरोबर महालात आला. रुयाशिमा आसनावर बसल्यानंतर एकेक मासा सुंदर आकर्षक पदार्थांनी भरलेली ताते त्याच्यासमोर ठेवू लागला. वातावरण सुंदर संगीतमय भरलेले होते. त्यातील काही मासे उराशीमापुढे येऊन नाचत होते. उराशीमला आपण तर स्वर्गात नाही ना असे क्षणभर वाटले. ओतोहिमे राजाने आग्रह करून उराशीमाला अनेक वर्ष ठेवून घेतले.

एकदिवस मात्र उररशिमाला आपल्या घराची आठवण येऊ लागली. तो अस्वस्थ झाला. “माझे कुटुंबीय, मित्रमैत्रिणी कुठे असतील? ते काय करत असतील? माझी आठवण त्यांनाही येत असेल का?” उराशिमा ओतोहिमेला म्हणाला,आतापर्यंत तुम्ही मला इथे आपुलकीने प्रेमाने ठेवून घेतल्याबद्दल मी तुमचं ऋणी आहे. आता मात्र मला घरी जायला हवे.”

“ का रे परत जायचा विचार करतोस ? तुला इथे बारे वाटत नाही का? इथेच रहा ना !” ओतोहिमे

“नको !माझ्या पाठीमागे माझी आतुरतेने वाट बघणारी माणसे आहेत.” उराशिमा

“अच्छा असे आहे काय ?मग नाईलाज आहे. तुला निरोप देताना मला खूप जड जात आहे. मी तुला माझी आठवण म्हणून एक मौल्यवान पेटी देतो. या पेटीत आमच्याबरोबर ह्या महालात घालवलेले दिवस आहेत. तू ही पेटी जोपर्यंत उघडून बघत नाही,तो पर्यन्त तू म्हातारा होणार नाहीस. तू कायम तरुण राहशील. ही पेटी जर तू उघडलीस तर मात्र महालात आता पर्यन्त घालवलेले दिवस पुढे पुढे सरकतील.”

“धन्यवाद ! ओतोहीमे,तुम्ही सांगितलेले मी नक्कीच लक्षात ठेवीन.”उराशिमा.

उराशिमा सर्वांचा निरोप घेऊन कासवाबरोबर भूतलावर परत आला.भूतलावरचे बदल पाहून उराशीमाला आश्चर्य वाटले. तीन वर्षात इथे खूपच बदल झाला आहे.””अरे हो, मी ह्याच जागी मासे पकडत होतो. घर ही दिसत नाही. ओळखीची माणसे दिसत नाहीत. कुठे गेले सर्व जण?” जवळून एक वयस्कर माणूस चालला होता त्याला थांबवून त्याने विचारले,”उराशीमचे घर कुठे आहे सांगू शकाल काय?” तेव्हा तो म्हातारा मानेला झटका देत म्हणाला “उराशिमा?” अरे तो तीनशे वर्षापूर्वी समुद्रात गेला होता तो परत आलाच नाही.

उराशिमा आश्चर्याने स्वत:शी उद्गारला “काय? म्हणजे महालात घालवलेली 3 वर्षे म्हणजे या भूतलावरची तीनशे वर्षे झाली? म्हणजे माझे आप्तस्वकीय कुणीच आता नसणार” त्याला खूप धक्का बसला. त्याची नजर हातात असलेल्या मौल्यवान पेटीकडे गेली. ओतोहिमेने सांगितले आहे जर का ही पेटी उघडली तर ज्या ठिकाणी रहात होतो तेच दिवस परत येतील. त्या विचाराच्या तंद्रीत त्याने टी पेटी उघडली. पेटी उघडताच त्या पेतीतून धूर बाहेर पडू लागला.त्या धूरात त्याला महाल दिसला,ओतोहिमेही दिसला. त्याला वाटले महालातील आनंदी दिवस परत आलेत. धूर कमी होऊ लागला तसे उराशिमा तारोचे केस आणि दाढी पांढरी होऊ लागली. आशा तरयेणे तरुण उराशिमा म्हातारा झाला.

सौ. विदुला अरविंद बुधकर-अपराजित 

प्रसिद्ध “ टोंनिक “जपान दिवाळी विशेषांक 2015-2016 

संपादक चित्रकार मानकरकाका  

  

Comments